Thursday, January 16, 2025

Latest Posts

India Vs Sri Lanka: विराटला सचिनच्या त्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

India Vs Sri Lanka: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे.आता पर्यंत यंदाच्या विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारताने एकही हार पत्करली नाही.तर दुसरीकडे श्रीलंकेला केवळ दोन सामने जिंकता आले आहे. त्यामुळे होणाऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड मानल्या जात आहे.विशेष म्हणजे या सामन्यात विराटला मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावे असलेल्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी लाभली आहे.(Will Virat Break Sachin Tendulkars this Record)

भारताच्या सर्व खेळाडूंनी यंदाच्या विश्वचषकात झालेल्या साखळी सामन्यात उत्तम कामगिरी बजावली आहे.भारताने  आता पर्यंत बलाढ्या संघांना धुळ चारली आहे. हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आता श्रीलंकेशी भिडणार आहे.भारताचे बलस्थान फलंदाजी असले तरी गोलंदाजांनी देखील आपली भूमिका चोख पणे बजावली आहे.सलामीवीरांच्या  कामगिरीकडे लक्ष दिल्यास भारताची सुरुवात चांगल राहिलेली आहे.मधल्या फळीतील फलंदाजांनी मात्र काही प्रमाणात निराशा जनक कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.श्रेयस अय्यरला अजून सूर गवसलेला नाही.तर के एल राहूल,शुभमन गिल यांनी देखाल चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे.गोलंदाजीतही भारताच्या गोलंदाजांनी नाराज केले नाही.मोहम्मद शमी,बुमराह, कुलदिप य़ादव, रविंद्र जडेजा यांनी देखील आपल्या कामगिरीची झलक दाखवलेली आहे. एकंदरीत उत्तम सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने सर्व सामन्यांवर विजय प्राप्त केला आहे.तर दुसरीक़डे श्रलंकेची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे.कर्णधार दासुन शनाका संघाला हाताळण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आला आहे.केवळ दोन सामने श्रीलंकेला विजय मिळाला आहे.तर गोलंदाजी प्रमाणेच फलंदाजी देखील फार प्रभावी दिसलेली नाही.त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड मानल्यात जात आहे.याच सामन्याला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या शतकाची बरोबरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.एक दिवसीय सामन्यात सचिनच्या नावे ४९ शतके  आहेत.तर विराटच्या नावे ४८ शतके आहेत.त्यामुळे विराटला सचिनची बरोबरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Latest Posts

Don't Miss