Wednesday, January 15, 2025

Latest Posts

Team India ला सोडून Virat Kohli एकटाच मुंबईत दाखल

समाज माध्यमांवर विमानतळावरील Virat Kohli चा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाने रविवारी आपल्या अखेरच्या साखळी सामनेदरलॅडला पराभूत करत विश्वचषकातील आपला सलग ९ वा सामना जिंकला.अशात भारतीय संघ अजून बंगळुरूमध्येच असताना विराट मात्र एकटाच मुंबईत दाखल झाला आहे. (Virat Kohli Alone Reached Mumbai)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे येथे १५ नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे. यात जो कोणता संघ जिंकेल तो विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरेल. त्यासाठी टीम इंडियाचे आज मुंबईत आगमन होणार होते मात्र, भारतीय संघाआधी विराट कोहली एकटाच पोहोचला आहे. त्याचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.विराट कोहली मुंबई विमानतळावर पोहोचल्याच्या व्हिडीओमध्ये तो एकटाचं दिसत आहे. चेहऱ्यावर मास्क घातलेला कोहलीला पाहून जेव्हा चाहते फोटो काढायला आले तेव्हा कोहलीनेही मास्क काढून त्यांच्याबरोबर फोटो काढले. दुसरीकडे, तो संघाबरोबर का आला नाही याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे. काल रात्रीपर्यंत तो बंगळुरूमध्ये होता, जिथे भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना खेळला गेला होता आणि त्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले होते. त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील स्टेडियममध्ये होती, ती कोहलीची गोलंदाजी पाहून खूप आनंदी दिसत होती आणि विराटची विकेट घेतल्यानंतर तिची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली. एवढे सगळे असतानाही तो एकटा का आला? याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.या विश्वचषकात विराट कोहलीने २ शतकी खेळी खेळली खेळल्या आहेत. त्याने पहिले शतक (१०३) बांगलादेशविरुद्ध आणि दुसरे शतक (१०१) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले. याशिवाय कोहलीने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत ५ अर्धशतके देखील केली आहेत. सध्या कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, त्याने ९ सामन्यात ५९४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ९९ इतकी असून जी या विश्वचषकातील सर्वोच्च आहे.

Latest Posts

Don't Miss