Saturday, January 11, 2025

Latest Posts

इंद्रदीप घोष व गौरीशंकर कर्माकर यांच्या व्हायोलीन-तबला जुगबंदीने नागपूरकर रसिक मंत्रमुग्ध

Nagpur Violin-Tabla Jugbandi : स्व.पं.श्रीधर पार्सेकर व पं.विष्णुपंत कावळे स्मृती प्रीत्यर्थ आयोजित दोन दिवसीय व्हायोलीन महोत्सवानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध झाले. (Pandit Sridhar Parsekar and Pandit Vishnupant Kawle Smriti Prityerth organized two-day violin festival) दि.२५ व २६ फेब्रुवारी रोजी श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे कार्यक्रम सपंन्न झाला.(Violin-Tabla Jugbandi at Shri Gurudev Sevashram Nagpur)

भजनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

रविवारच्या प्रथम सत्रात विदर्भाचे प्रख्यात गायक गुणवंत घटवाई यांच्या राग मधुवंतीतील बंदिश व तराणा प्रस्तुतीने उपस्थितांची दाद मिळवली तसेच गुणवंत घटवाई यांनी  राष्ट्रसंतांच्या ‘वाचे विठ्ठल गाईन, नाचत नाचत पंढरी जाईन..’ ह्या भजनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दिल्लीचे पं. संतोष नाहर यांनी व्हायोलिन वर आपल्या बहारदार वादनाने राग किरवाणीवरील गत व राग मांड वर आधारित ‘केसरिया बालम..’ हे सर्वश्रुत लोकगीत सादर करून उपस्थितांची रसिकांची मने जिंकली. तसेच, खैरागड येथील पं.विवेक नवरे यांच्या सरोद वरील राग पुरिया कल्याण मधील गतच्या सादरीकरणने सर्व श्रोते उल्हासित झाले. सोमवार रोजी प्रवीण कावळे व शिष्य करण ओगाणिया, केतकी नाईक, कुणाल यावले व आकाश खरे यांनी विविध रागांवर आधारित बंदिशी सादर करून रसिकांना भाव विभोर करून सोडले.

जुगलबंदीने रसिकांच्या अमाप टाळ्या मिळवल्या

प्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रवीण कावळेनी (Violinist Praveen Kavaleni) राग बिहागचे पैलू उलगडले तसेच आपल्या सादरीकरणाची सांगता राग देस मधील दादरा ने केला. सोमवार रोजी ऑस्टिन (USA) येथील तरबेज तबलावादक पं. गौरीशंकर कर्माकर यांच्या कौशल्यपूर्ण तीनतालातील एकल पेशकार, कायदा व चक्रदार वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. (Tabla player Pandit. Gauri Shankar Karmakar) महोत्सवाचा शेवट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलीन वादक पं. इंद्रदीप घोष (Violinist Indradeep Ghosh) यांच्या अभूतपूर्व व्हयोलीन वादनाने झाला. त्यांनी गायकी व तंत्रकारीचा मिलाप साधत राग जोग मध्ये विलंबित ख्याल व गत सादर केली. तदनंतर पं.घोष यांचे व्हायोलिन वरील राग कौन्सी कानडा तसेच पं. गौरीशंकर यांच्यासह तबला जुगलबंदीने रसिकांच्या अमाप टाळ्या मिळवल्या. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रसिद्ध भजन ‘मनी नाही भाव…’ सादर करून नागपूरकरांची मने जिंकली. राम खडसे, गोविंद गडीकर, राम जोंधळे, महेंद्र कदम, राजेश ठाकरे यांची साथसंगत लाभली. प्रवीण कावळे व मित्र परिवार व श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर यांच्या सहाय्याने कार्यक्रम पार पडला. डॉ.अंजली पारनंदीवार यांनी सूत्र संचालन केले. शहरातील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.(There was a spontaneous response from Nagpur city)

violin-tabla jugbandi got good responce in nagpur

Latest Posts

Don't Miss