Monday, November 18, 2024

Latest Posts

आई, कुस्ती जिंकली पण मी हरले… विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

| TOR News Network |

Vinesh Phogat Latest News :  भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने जड अंत:करणाने कुस्तीला अलविदा केलं. (Vinesh Declared Retirement) तिने ट्विटरवर पोस्ट करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. विनेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं… आई, कुस्ती जिंकली पण मी हरले. माफ कर मला. (Phogat Sorry To Mother on Tweet) तुझं स्वप्न… माझी हिंमत सर्व संपलंय. याहून अधिक ताकद राहिली नाही माझ्यात. अलविदा कुस्ती. कायम तुमची ऋणी राहीन.. माफ करा…!

ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 100 ग्रॅममुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. (Phogat Shoked for out of Olympic) त्यानंतर विनेशने तिच्या करिअरमधला मोठा निर्णय घेतला आहे. (Vinesh Phogat Big Dicusion) विनेश फोगाटने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये निराशा आहे. तिने हिंमत सोडू नये अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र संपूर्ण भारताची जनता विनेशच्या पाठीशी उभी आहे.(All Indians Behing Vinesh Phogat) तिने खचून जाऊ नये आणि ताकदीने उभं राहावं… आम्हाला तिचा अभिमान असल्याचे ट्विट चाहत्यांकडून केले जात आहे. इतकच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी विनेशचं कौतुक केलं आहे.

विनेश फोगाटने आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधत्व केलं आहे.(Phogat Represent 3 times india in Olympic) रिओ ऑलिम्पिकमध्ये ती तिच्या पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापतीमुळे तिला ऑलिम्पिकमधील बाहेर व्हावे लागले आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती तिच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यामुळे ती बाहेर झाली. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिने तिची वजन गट बदलला आणि दमदार तयारी करून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. परंतु नशिबाने सुरुवातीला साथ दिली आणि शेवटच्या सामन्यात काळा दिवस दाखवला.

Latest Posts

Don't Miss