Saturday, January 11, 2025

Latest Posts

गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे : काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपन्न  

| TOR News Network | Gadkari vs Vikas Thakre : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.मात्र महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार देण्यात येणार याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.अशात आज माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.यात आमदार विकास ठाकरेंचे नाव पुढे आल्याची माहिती सुत्रांनी दिली.या बैठकीचे फोटोही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे निश्चित झाल्याची माहिती आहे.(Mla Vikas Thakre from Nagpur lok sabha) विकास ठाकरे यांच्या नावाला सतीश चतूर्वेदी सूचक, तर डॉ. नितीन राऊत अनुमोदक आहे, असे सांगितले जात आहे. गडकरींच्या विरोधात लढायचे तर उमेदवारही तेवढाच तगडा हवा आणि नागपूरच्या राजकारणात विकास ठाकरे काँग्रेसचे वजनदार नेते मानले जातात.(Nitin Gadkari vs congress mla Vikas Thakre from Nagpur)

लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून भाजपचे हेवीवेट नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून २०१९ च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी लढत दिली होती. यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून कोण लढणार, याची उत्सुकता देशभरात लागलेली आहे. अशा स्थितीत एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.(Congress nagpur meeting held for nagpur loksabha)

विकास ठाकरे नागपूरचे महापौरसुद्धा राहिलेला आहेत. त्यामुळेच शहराच्या प्रत्येक परिसराची खडानखडा माहिती त्यांना आहे. नागपुरात ते गडकरींना चांगली लढत देऊ शकतील, असे चित्र कॉंग्रेसच्या नेत्यांकडून उभे केले जात आहे. पहिल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीयमंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्क्यांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मुत्तेमवार यांनी नागपूरमधून उमेदवारीच मागितली नाही. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते. त्यांचाही सुमारे सव्वा दोन लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव झाला.

Latest Posts

Don't Miss