Saturday, January 11, 2025

Latest Posts

ते 3 मंत्री पैशांशिवाय काम करत नाही – Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar Nagpur News : विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षा भूमीला भेट दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार मधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले राज्य सरकामधील 3 मंत्री पैसे घेतल्या शिवाय काम करत नसल्याचे म्हणटंले आहे.(Vijay Wadettiwar says 3 minister from Maharashtra Govt did not work without Taking Money)

आरोग्य विभागात खूप मोठे घोटाळे सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात आरोग्य खात्यात भोंगळ कारभार समोर आणणार असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरोग्या मंत्री तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे आहे. आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झाले आहेत. ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये मांडू.भ्रष्ट्राचाराचे पुरावे दिल्यानंतर तरी मुख्यमंत्री कारवाई करतील का, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्य सरकारवर सडकून टिका करताना ते म्हणाले सरकारमधील 3 मंत्री पैशांशिवाय काम करत नाही., असे मोठे विधान त्यांनी केले मात्र, वडेट्टीवार यांनी मंत्र्यांची नावे जाहीर केली नाहीत.

संविधान रुपी ग्रंथाची जोपासना करू

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा सर्व भारतीयांना दिला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनीचं देशाला दिलं आहे. त्यामुळेच देशातील लोकशाही चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकणार असल्याच्या भावना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. संविधान रुपी ग्रंथाची जोपासना करू,टिकवू आणि रक्षण करू हीच खरी श्रद्धांजली बुधवारी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महामानवाला ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, ते नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बोलत होते.

Latest Posts

Don't Miss