| TOR News Network |
Vidhanparishad Election Latest News : आज विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. विधानभवनात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (MLC Elections 2024 ) तर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणाला धक्का बसणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. यात त्यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीत आमदारांचा रेट सांगितला आहे. (Jayant Patil On MLA Rates)
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक काही तासांवर आली आहे. शुक्रवारी (12 जुलै) ही निवडणूक होणार आहे. या 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. (Vidhanparishad Election Voting 2024)
विधान परिषद निवडणुकीत आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. आमदार फोडण्यासाठी 4 ते 5 कोटींची ऑफर दिली जात आहे, (Four to Five cr offer to break mla) असा आरोप पाटील यांनी केला आहे. कुणाचे आमदार फुटणार हे उद्या समजेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आज विधानपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार रिंगणात नाही. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं भवितव्यही आज निश्चित होणार आहे. आपले तीन्ही उमेदवार विजयी होतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. (Mahavikas Aghadi claim to win)
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल पॉलिटिक्सचा जोर वाढला आहे. निवडणुकीत आमदारांची फुटाफूट टाळण्यासाठी भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलवर ठेवला होता. विधानपरिषदेची निवडणूक आणि त्यानंतर लगेच काही तासांनी याचा निकाल लागेल. (Vidhanparishad Result 2024) आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.