Sunday, November 17, 2024

Latest Posts

रणजी करंडक : विदर्भच्या पठ्ठ्यांनी गाठली फायनल

| TOR News Network | Ranji Trophy 2023-24 Latest News : अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या रणजी करंडकाच्या सामन्यात विदर्भाने  मध्य प्रदेशवर 62 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील पहिल्या उपांत्य फेरीत विदर्भच्या पठ्ठ्यांनी मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर हा सामना झाला. अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. (Vidharbha Team Enter in Final Of Ranji Trophy)

मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा 2 मध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ संघ 41 वेळा चॅम्पियन मुंबईशी भिडणार आहे. म्हणजे यावेळी रणजी ट्रॉफी ही महाराष्ट्रातच राहणार.

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला आहे. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 170 धावांवर आटोपला. यानंतर मध्य प्रदेशने पहिल्या डावात 252 धावा करत आघाडी घेतली.

मध्य प्रदेशला 321 धावांचे लक्ष्य

पण विदर्भाने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले. यश राठोडच्या 141 धावांच्या खेळीच्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. अशाप्रकारे मध्य प्रदेशला 321 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. 321 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात 258 धावांत गारद झाला.सामन्यात अक्षय वखरे,यश ठाकूरने प्रत्येकी ३ तर आदित्य ठाकरे व अदित्य सरवटेने प्रत्येकी २ गडी बाद केले.

विदर्भ संघ 2017-18 आणि 2018-19 मध्ये चॅम्पियन झाला होता. 41 वेळा चॅम्पियन मुंबई संघाने शेवटचे 2015-16 मध्ये विजेतेपद पटकावले होते. या हंगामात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली असून केवळ 1-1 सामने गमावले आहेत. विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीबद्दल सांगायचे तर यश राठोड हा सामनावीर ठरला. त्याने दुसऱ्या डावात 141 धावांची खेळी केली. विदर्भाला 402 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली.

Latest Posts

Don't Miss