| TOR News Network |
Maharashtra Cabinet Latest News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका भारतीय जनता पक्षाला बसला. (Big Loss To bjp In Loksabha) अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यानंतर राज ठाकरे यांची मनसे सोबत असताना महायुती प्रभाव पडला नाही. आता पराभवाचा फटका नेत्यांना बसणार आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.(responsibility for the defeat will be determined) ज्या नेत्यांना त्यांच्या परिसरात प्रभाव पडता आला नाही, त्यांची गंच्छची होण्याची शक्यता आहे. एनडीएची केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.(Cabinet Expansion in Maharashtra) आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे.(Damage Control By Mahayuti) राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. त्यासाठी आज भाजपची बैठक होत आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत पराभवाची कारणे शोधली जाणार असून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार तीन वेळा झाला आहे. (Three Time Cabinet Expansion) परंतु एक मंत्रिमंडळ विस्तार केवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील मंत्र्यांना संधी देण्यासाठी झाला. त्यावेळी शिवसेनेतील अनेक इच्छूकांना मंत्रिपद मिळाले नाही. संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांची नावे चर्चेत राहिली. (Soon Many New Faces In Maha Cabinet) परंतु त्यांना संधी अजूनही मिळाली नाही. आता शेवटच्या सहा महिन्यांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रीपदाची संधी मिळते, याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार गट बारामतीच्या पराभवाची चिंतन करणार आहे. त्यासंदर्भात दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे. बारामतीमधील पराभवासंदर्भात दोन दिवसांत अजित पवार यांना अहवाल दिला जाणार आहे. काही बूथवर शरद पवार गटाचा पोलिंग एजंट नसताना कसे मतदान जास्त झाले त्याच चिंतन केले जाणार आहे.