Monday, November 18, 2024

Latest Posts

मनुस्मृतीतील श्लोकावरुन वाद पेटला : अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू – वर्षी गायकवाड

| TOR News Network |

Varsha Gaikwad Latest News : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. त्यांना देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंताआहे, टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली.(Varsha Gaikwad On Manusmriti Shlok) तसंच अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाकडून अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय.(Manusmriti Shlok Inclusion In School Syllabus) यामुळं राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जातोय. तर यात आता हिंदु जनजागृती समितीनंही उडी घेतल्यानं हा वाद अजूनच पेटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’नं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र, यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. मुलांना भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. परंतु, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असल्याचे कानावर. यामधून लक्षात येते की, राज्य सरकारची संविधानाविषयीची मानसिकता काय आहे. (Sharad Pawar on Manusmriti Shlok )सामाजिक संस्थांसह प्रागतिक लोकांनी दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालायचं ते यांना कळत नाही,” असा टोलादेखील लगावला.

“काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरले नाहीत,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Dcm Fadnavis on Congress)”मनाच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याविषयी मला माहिती नाही. मात्र, विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे.”

“अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला. परंतु, आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली, तर ‘वयोवृद्ध’ म्हणून त्यांना कोण मान देतंय? त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बहेर पडले. मनुस्मृतीमध्ये दिलेला श्लोक त्यांनी वेळेत वाचला असता, तर त्यांच्या पक्षावर आज ही वेळ आलीच नसती”, अशी टीका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली. (Ramesh Shinde on Ncp Sharad Pawar Group)

Latest Posts

Don't Miss