Saturday, January 18, 2025

Latest Posts

वंचित बहुजन स्वतंत्र निवडणूक लढवणार, पहिली यादीत जाहीर

| TOR News Network | Vanchit Aghadi Lok Sabha List : महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी स्वातंत्र निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. (Prakash ambedkar from akola loksabha)

बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचे १६ उमेदवार जाहीर केले.त्या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीनेही ८ लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.(Vanchit loksabha candidate list )या मध्ये वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. रामटेकच्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला नाही.

जाहीर झालेल्या ८ उमेदवारांमध्ये भंडारा गोंदियातून संजय केवत,गडचिरोली चिमूर येथून हितेश मडावी, चंद्रपूर मधून राजेश बिली, बुलढाणा येथून वसंत मगर, अमरावतीतून प्रजक्या पिल्लेवान, वर्धा राजेंद्र सोळुंके तर यवतमाळ वाशिम मधुन खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.आज जाहीर झालेल्या वंचितच्या यादीवरुन प्रकाश आंबेडकरांनी एकला चलो रेचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Latest Posts

Don't Miss