Monday, November 18, 2024

Latest Posts

मोठं ऑपरेशन… शेवटचे तीन तास महत्वाचे

सिलक्यारा बोगद्यातील रेस्क्यू कार्यात बदल

Uttarakhand Silkyara Tunnel Latest News: उत्तराखंडातील सिलक्यारा येथील बोगद्यात भूस्खलन होऊन 41 मजूरांना अडकून आज 12 दिवस झाले आहेत. आज मजूरांची सुटका होणार होती. परंतू ऑपरेशन थोडं लांबले आहे. आता या ऑपरेशन मध्ये काही बदल करण्यात आले आहे. पण हे महत्वाचे ऑपरेशन हाताळताना शेवटचे तीन तास महत्वाचे असणारा आहेत.

पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले की बुधवारी रात्री ड्रीलिंग करताना पोलादी स्ट्रक्चरमध्ये आल्याने ऑपरेशन थांबवावे लागले. शुक्रवारी सकाळी हा अडसर दूर करण्यात आला. त्यानंतर ड्रीलिंगचे काम पुन्हा सुरु झाले आहे. सर्वकाही सुरळीत सुरु राहीले तर येत्या पुढील काही  तासांत मजूरांपर्यंत पोहचता येईल. एकदाचा रेस्क्यू पाईप मजूरांपर्यंत पोहचला की एनडीआरएफची टीम एक-एक करून मजूरांना बाहेर काढणार आहे. एडीआरएफची 21 सदस्यांची टीम बाहेर उभी असणार आहे. त्यांच्याकडे ऑक्सिजन पॅक मास्क आणि चाकांची स्ट्रेचर आहे.कमी उंचीच्या स्ट्रेचरवर मजूरांना झोपवून दूसऱ्या बाजूंनी रस्सीने खेचावे लागणार आहे.(Plan changed in rescue Operation for 41 Labour Trapped In Uttarakhand Tunnel. Now Will Be Taken Out On Stretchers) एकावेळी एक अशा पद्धतीने मजूरांना बाहेर काढावे लागणार आहे. या प्रक्रीयेला तीन तास लागणार आहेत. मजूर बाहेर आले की 41 एम्ब्युलन्स मधून त्यांना चिन्यालीसौड येथील कम्युनिटी सेंटरमध्ये 41 बेडच्या स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss