Saturday, January 18, 2025

Latest Posts

उरण हत्याकांड : अखेर आरोपी दाऊद शेखला अटक

| TOR News Network |

Uran Murder Latest News : सध्या राज्यात गाजत असलेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित दाऊद शेखला अखेर अटक झाली आहे. (Uran Murder Accused Dawood Shaikh arrested) आरोपीला पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी रविवारी उरणमध्ये नागरिकांनी मोर्चा सुद्धा काढला होता. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असं तिने तिच्या पालकांना सांगितलं. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.(Yashashri Parents register complaint for missing)

शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला.(Yashashri Dead Body Found) अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं. शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. पोटावर, पाठीत भोसकल्याच्या जखमा होत्या. या प्रकरणात दाऊद शेखर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. दाऊदच शेवटच लोकेशन कर्नाटक होतं.(Dawook Sheik Arrested from Karnataka Gulbarga) त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला होता. टेक्निकल एनलिसिसच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(Dawood arrested by Technical Analysis)

पोलीस दाऊदला घेऊन नवी मुंबईत येत आहेत. त्याला कोर्टात हजर करुन पोलीस कठोडी मागण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येईल, असा अंदाज आहे. शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना एक फोन आला. कोटनाका परिसरात एका मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे, असं सांगण्यात आलं. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. पोटात आणि कमरेत भोसकल्याच्या तीन जखमा होत्या. पालकांनी कपड्यांवरुन आणि तिच्या शरीरावर टॅटू गोंदवलेला होता, त्यावरुन मृतदेह तिचाच असल्याची ओळख पटवली. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दाऊद शेखवर संशय व्यक्त केला होता. तो आता पोलिसांच्या अटकेत आहे.

Latest Posts

Don't Miss