Saturday, January 18, 2025

Latest Posts

अजून पुढील तीन दिवस अवकाळीचा फटका

| TOR News Network | Imd Prediction Latest News : राज्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेत मालाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.तर दुसरीकडे प्रशासन अन् शासन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहे. यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला. राज्यात 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.(IMD Forecast) राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. (Rain In Maharashtra Between April 13 And 15)

काय आहे आयएमडीचा इशारा

13 एप्रिल रोजी मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. या वेळी वादळी वारा आणि गारपीटीचा अंदाज आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे. यामुळे राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही कायम राहणार आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत आज रेड अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून नागपूरात अवकाळी पाऊस झाला. (Nagpur rain updates) आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. नागपूरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला होता. आता त्या तुलनेत पावसाचा जोर अधिक असून पुढील ३ दिवस पाऊस कायम राहणार आहे.(again 3 days rain in vidarbha region) विदर्भात एकीकडे पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असताना त्यावरही पावसाचा फटका बसत आहे.

मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू

मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.(3 died due to rain) तसेच 56 जनावरे दगावली आहेत. संभाजीनगर, बीड जिल्ह्यात पुन्हा गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यात एक हजार तर नांदेडमध्ये 754 हेक्टर शेतीला फटका बसला आहे. (Farmers in trouble due to unseasonal rain) अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात अवकाळी आणि वादळी पावसात वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली याठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे

Latest Posts

Don't Miss