Saturday, January 18, 2025

Latest Posts

विदर्भासह अनेक ठिकाणी अवकाळीचे ढग

| TOR News Network | Latest IMD Rain Report (April 2024) :  पुणे-मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज (सोमवारी ता. २२) वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, विजांचा गडगडाट होईल, असा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. (Yellow Alert’ has been given by IMD)

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह आज (सोमवारी ता. २२) गारपीट होण्याचा इशारा आहे.(Today rain warning in Vidarbha) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.(Lightning Rain in maharashtra)

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. बीड, उस्मानाबाद, छ. संभाजीनगर, जळगाव यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. (Heavy Thunderstorm) या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Yellow alert in maharashtra) तर परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही शक्यता आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Latest Posts

Don't Miss