Saturday, January 11, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरेंचा नवा नारा… भाजपमुक्त जय श्रीराम

आता ‘भाजपमुक्त जय श्रीराम’ करावा लागेल- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Bjp at Nashik : नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत. (Uddhav Thackeray bjp free Jai shree Ram at nashik)

या महाअधिवेशनात बोलताना ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. राम कुठल्याही व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी मालकी केली तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजपमुक्त श्रीराम. नुसतं जय श्रीराम नाही. भाजप मुक्त जय श्रीराम. काय चाललंय आज. ज्यांनी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवलं. शिवसैनिक सोबत होते. काही कारसेवक आजही आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

ठाकरेंचा भाजपवर शाब्दिक हल्ला

मी अयोध्येला गेलो. अयोध्येला कधी येणार सांगत होते. आज मोदी अयोध्येला गेले. पण पूर्वी गेले नव्हते. पंतप्रधान होण्याआधी गेले असतील. फडणवीस म्हणतात तसे म्हणाले. मी शिवनेरीला गेलो. मी तिथली माती अयोध्येला गेलो. तुम्ही माना अथवा नको मानू. मी तिथे गेलो आणि थंड बस्त्यातील अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा त्या मातीचा महिमा आहे. ती माती जिल्ह्यात न्यायला सांगतो. कारण त्याचा महिमा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला.

राऊतांच्या भाषणावर ठाकरेंची टिपण्णी

काही वेळेआधी संजय राऊतांनी या अधिवेशनात भाषण केलं. यावेळी त्यांनी ठाकरेंची प्रभूरामांशी तुलना केली. यावर ठाकरेंनी भाष्य केलं. आज रामायणातील बारकावे संजय राऊत यांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते. राऊतांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा याचे श्लोक सांगितले. संयम , एक वचनी आणि एक पत्नी ते खरच आहे. माझा उल्लेख केला. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. श्रीरामचंद्राचे अनुयायी म्हणून बरोबर आहे. रामाशी तुलना केली नाही त्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत ठाकरेंनी राऊतांचे आभार मानले.

Latest Posts

Don't Miss