Saturday, January 18, 2025

Latest Posts

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

| TOR News Network |

Uddhav Thackeray Latest News : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या सर्वच पक्ष हे महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. नुकतंच उद्धव ठाकरेंची शिर्डीत एक जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच मुख्यमंत्रीपदा बद्दल देखील त्यांनी मोठे विधान करत आहले मत व्यक्त केले. (Uddhav Thackeray on Cm Post)

उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.(Uddhav Thackeray Sambhajinagar News ) यावेळी उद्धव ठाकरेंनी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला हजेरी लावली. (Uddhav Thackeray visit juni pension adhiveshan) यावेळी त्यांनी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन एक महत्त्वाचे विधान केले. त्यासोबतच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल, असा सावधगिरीचा इशाराही यावेळी दिला.

गेलेली सत्ता परत येते आणि जाते, नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे. त्यामुळे एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल. यांना पेन्शन नाही, टेन्शन द्यायला हवं. उपोषणाची हाक दिली पण ते करू नका. आपलं आंदोलन असं असायला हवं की हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत, हा निर्धार करा. आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अमलात आणल्याशिवाय राहायचं नाही. निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आणली, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.(Uddhav Thackeray on Ladki Bahin yojana)

“आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजनाची मान्य केली तर तुम्ही काय करणार? निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत. तुम्ही जर आमचं सरकार आणलात तर मी तुमची मागणी मान्य करतो. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, जर हे स्वत:च्या शिवसेना या आईवर वार करु शकतात, हे तुमच्यावर वार करणार नाहीत. त्यामुळे मला हे सरकार नको आहे. माझं मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही पडत नाही. (Uddhav Thackeray on Cm post) मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss