Saturday, January 11, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही

पोलीसांनी जितेंद्र आव्हाडांना काय सांगितले

आज दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ठाण्याच्या मुंब्र्यात जाणार आहेत. तेथे ठाकरे गटाची 22 वर्ष जुनी  शिवसेनेची मध्यवर्ती शाखेची इमारत बुलडोजर लावून पाडण्यात आली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ते घटना स्थळी जाणार आहेत. (Past Chief Minister Uddhav Thackeray To Visit Demolished Mumbra Shakha Today) त्या पहिले मात्र शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर त्यांच्यात आणि पोलीसात झालेल्या संवादा संदर्भात एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे.

मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मुब्रा परिसरातील शंकर मंदिर परिसर शिवसेनेची मध्यवर्ती शाखा गेल्या 22 वर्षांपासून होती.ती मात्र बुलडोझर लावून पाडण्यात आली. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येत आहेत. सायंकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करणार असून मुंब्रावासीयांशी ते संवाद देखाल साधणार आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले होते.ते मात्र ठाकरे यॆण्यापूर्वीच   फाडण्यात आले आहेत.या संपूर्ण घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली आहे.यात त्यांनी त्यांच्यात आणि पोलीसात झालेल्या संवादा संदर्भात माहिती देऊन खळबऴ उडवून दिली आहे.उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला पोलिसांचाच आक्षेप असल्याचा मोठा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे. मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती.यावर त्यांनी,असे काहीही होणार नाही, आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे, असं मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती.एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात. आणि सर्वत्र नजर असणाऱ्या पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत, असा दावाही या ट्विटमध्ये आव्हाड यांनी केला आहे.या दौऱ्यामुळे मात्र मुब्र्यात राडा होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss