Saturday, January 18, 2025

Latest Posts

अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो सत्ता येते जाते….

कोकणातील सभेत उद्धव ठाकरे संतापले

| TOR News Network | Uddhav Thackeray On Cm Shinde : उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.(Jan Samvad Yatra) राजापुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाली.या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज राजपुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा नवा नारा… भाजपमुक्त जय श्रीराम

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“इथे भगव्या टोप्या आहेत. इथे मुस्लिम समाज आहे. रायगडमध्ये मला मुस्लिम समाजाने मराठी कुराण दिलं. त्यांना आपलं हिंदुत्व समजलं आहे. आपलं हिंदुत्व धर्मधर्मात आग लावणारं नाही, असे म्हणत आज राजनची पाठ थोपटायला आलोय, संकटाच्या काळात कोण पाठी उभं राहतं ते त्यांना कळतं,” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एसीबीच्या धाडीवरुन संतापले…

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ACB ने आमदार राजन साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. “या यादीवर सुशांत चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे. सावंत मराठी वाटतोय, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत 5 हजार लावली, बाळासाहेब ठाकरे फोटो आणि खुर्ची दहा हजार रुपये लावली, असे सांगत तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही,” अशा शब्दात ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

 एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्विकारला

मुख्यमंत्र्यांवर निशाणा…

“शिंदेंना (Eknath Shinde) त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरत आहेत. राजन साळवीच्या विरोधात कोणी तक्रार केली,काय मिळालं तुम्हाला? सत्ता येते जाते, अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो. वेळ बदलते. कोणाला सोडणार नाही, असा इशारा देत राजनच्या विरोधात जो उमेदवार आहे तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा,” असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

Latest Posts

Don't Miss