Saturday, January 18, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरे यांची गडकरींना खुली ऑफर म्हणाले….

| TOR News Network | Uddhav Thackeray Offer to Nitin Gadkari : उद्धव ठाकरे सध्या राज्यात लोकसभेच्या प्रचारासाठी फिरत आहेत. लोकांशी संपर्क साधत असून ते जाहीर सभा घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात आणि राज्यात स्थापण होणार असा विश्वास त्यांना आहे. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मतदारांसह शिवसैनिकांना करत आहे.(Uddhav Thackeray Offer to Nitin Gadkari)

केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिली आहे. मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे, हे दाखवून द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (Why to bend in front of modi)ते यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेतून बोलत होते.

नितीन गडकरी हे धाडसी मंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यात ठिकठिकाणी वादळी सभा घेत आहेत. (Uddhav Thackeray pusad Sabha)पुसद येथील जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी हे तत्कालिन युती सरकारमधील धाडसी मंत्री होते. त्यांचा वेगळाच रुबाब होता. गडकरींनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केलं”.

भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही….

“नितीन गडकरी  यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण गेल्या आठवड्यात भाजपने लोकसभेच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मोदी अमित शहा यांची नावे आहेत.(No Name of Gadkari Declared) इतकंच नाही, तर कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या माणसाचे नाव आहे. पण गडकरींचं नाव नाही. भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही, याबाबत मला कल्पना नाही”.

आम्ही तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ

पण नितीन गडकरी महाविकास आघाडीसोबत आल्यास आम्ही त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशात आमचं (महाविकास आघाडीचं) सरकार येणार असून आम्ही तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर देखील उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे.(We Will Give you Big Ministry)

दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांची ऑफर

दरम्यान, यापूर्वी देखील एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती. ठाकरेंच्या या ऑफरवर गडकरींनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss