Saturday, January 18, 2025

Latest Posts

एकाच दिवशी उद्धव ठाकरे यांना दोन मोठे धक्के

एक नेता सोडून गेला दुसऱ्याकडे ईडीची धाड

Uddhav Thackeray Latest News Today : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या म्हणजेच बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.निकालाआधीच ठाकरे गटाला एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले आहेत. (Uddhav Thackeray in Trouble)

आमदार रवींद्र वायकर अडचणीत सापडले असून त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीने धाड टाकली आहे.(ED Raid on Shivsena Leader Ravindra waikar) जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे.

त्यामुळे आमदार वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ४० वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. (Anil Jagtap Exits shivsena in Beed)

मंगळवारी ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.(Beed News anil Jagtap joins shinde group) दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अनिल जगताप हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मुंबईला निघण्यापूर्वी जगताप यांनी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे. त्याच्यापाठोपाठ जवळपास ५०० गाड्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाल्या आहेत. अनिल जगताप यांचा बीडमध्ये मोठा दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

आता ते एकनाथ शिंदे यांना साथ देणार असल्याने शिंदे गटात आनंदी आनंद आहे. सुषमा अंधारे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आपण ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जगताप यांनी जाहीर केलं आहे. एकीकडे आमदार अपात्रतेचा निकाल तोंडावर असताना दोन मोठे धक्के बसल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

Latest Posts

Don't Miss