| TOR News Network |
Sanjay Nirupam Latest News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. (Uddhav Thackeray in Delhi) या दौऱ्यात ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुक बघता आणि तिकीट वाटपा संदर्भात हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. अशात आता त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुन त्यांच्यावर विरोधकांकडून हल्ले केल्या जात आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.(Sanjay Nirupan Slams uddhav thackeray) ‘उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत’, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते. सध्या उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा लाचारीचे एक उदाहरण आहे, असे निरुपम म्हणाले. (Sanjay Nirupam On Uddhav Thackeray)‘बाळासाहेब ठाकरे हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत.
पुणे, नाशिकमध्ये पूरस्थिती असून त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि उपाययोजना करत आहेत. (Sanjay Nirupan on Eknath Shinde) त्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला. मात्र, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या दारात गेले आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.(Sanjay Nirupam on Mahavikas Aghadi) त्यांचे सरकार येणार नाहीच पण तरीही मविआतला प्रत्येक नेता मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, असा टोलाही निरुपम यांनी लगावला.
नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासह आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, उबाठाने यावर कुरघोडी करुन दिल्ली गाठली. मविआतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.(sanjay Nirupam on Uddhay Thackeray Delhi visit)