Saturday, January 11, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरे : मला भाजपची चिंता वाटते, कारण…

Theonlinereporter.com – May 16, 2024 

Uddhav Thackeray Latest News :  उद्धव ठाकरे यांनी  नाशिकच्या विराट सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Uddhav Thackeray Slams Pm Modi) मोदीजी तुम्ही 4 जूननंतर पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा पीएम केअर फंडचं काय करणार आहात? (Uddhav Thackeray on Pm Fund) कुणाच्या हातात तो देणार आहात? तेही सांगून टाका.मला भाजपची चिंता वाटते. कारण दोन वर्षानंतर तुम्ही झोळी लटकवून निघून जाल. तेव्हा भाजपची अवस्था काय होईल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray Questioned modi)

नकली सेना निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी अखेर उत्तर दिलं आहे. (Uddhav Thackeray On Shivsena merge) गेली 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तुमच्याकडून दगाफटका खाऊनही आम्ही तुमच्यासोबत राहिलो. तरीही आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? (Uddhav Thackeray on Congress) असा सवाल करतानाच जोपर्यंत हे समोर बसलेले शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मला चिंता नाही. तुम्ही भाजपची चिंता करा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

विरोधकांकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, अशी टीका आमच्यावर करता. (Uddhav Thackeray on Pm Post) आमच्याकडे चेहरे आहेत. तुमच्याकडे तर चेहराच नाही. दोन वर्षानंतर तुमची अवस्था काय होईल ते पाहा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजप फुटल्याशिवाय राहणार नाही. (Uddhav Thackeray On Bjp After 5 june) त्यानंतर जे उंदीर तुमच्याकडे पळाले त्यांच्या शेपट्या कशा पकडतो ते पाहा, असा इशाराच त्यांनी दिला.

गेल्या निवडणुकीत मोदींनी 200 च्या वर सभा घेतल्या. (Uddhav Thackeray On Modi rally) जिथे गेले तिथे भाजपचा सुपडा साफ झाला. तुम्ही नाशिकमध्ये या. म्हणजे भाजपचा सुपडा साफ होईल. महाराष्ट्राने तुम्हाला 40च्यावर खासदार दिले. तुमच्यावर उपकार केले. त्याची फेड अपकाराने करता? तुम्ही आज मतांची भीक मागत आहात. दहा वर्ष महाराष्ट्राला आणि जनतेला फसवलं. आता महाराष्ट्र फसणार नाही, असं ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss