Saturday, January 18, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरे म्हणालेत भाई… असं कसं चालेल…

Uddhav Thackeray Calls Nitish Kumar For India Alliance : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच विविध घडामोडी घडत आहेत. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जागावाटपावर चर्चा करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्यात जागावाटपावर चर्चा होतेय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना फोन केला असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीला अवघे तीन ते चार महिने राहिलेत.अशातच इंडिया आघाडीत जागा वाटपावर अद्याप सहमती झालेली नाहीये. अशात आणखी काही पक्षही इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे कदाचित जागा वाटपाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या लोकसभेच्या जास्त जागा आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमार यांना फोन केला. या फोनमध्ये दोघांची विविध गोष्टींवर बातचित झाली. भाई… असं कसं चालेल… आतापर्यंत आम्ही काहीही केलेलं नाही. आमची कोणतीच रॅली झालेली नाही. कुणी संयोजक झालेलं नाही. जागा वाटपावरही सविस्तर चर्चा झालेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना आवाहन केल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं. हा… असं आहे की 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर देशात निवडणुका होऊ शकतात. मग वेळ आहे कुठे? वेळ उरलेलाच नाही, असं नितीश कुमार म्हणाले.

वंचितच्या भूमिकेकडे लक्ष

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याशी जागावाटपावर चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागापवाटपाचा फॉर्म्युलाही मांडला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? हे पाहावं लागेल.

Latest Posts

Don't Miss