Monday, November 18, 2024

Latest Posts

मशालीच्या ठाम भूमिकेमुळे पंजा, तुतारी हैराण : थेट दिल्लीत हायकमांकडे तक्रार

| TOR News Network | Maha Aghadi Seat Sharing : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप रखडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (Shivsena aggressive stance on seat sharing) लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २२ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते हैराण झाले आहेत. (Mahavikas aghadi sheat sharing trouble continues)

तक्रार थेट दिल्ली हायकमांकडे

जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी ठाकरे गटाच्या आक्रमकपणाची तक्रार थेट दिल्ली हायकमांकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीने सोडवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या २२ जागांवर निवडणूक लढवली होती. यातील तब्बल १८ जागांवर त्यांचे खासदार निवडून आले होते.

उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात

मात्र, शिवसेनेतील अभुतपूर्व फुटीनंतर यातील १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे या खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही ठाकरे गट २२ जागा लढवण्यावर ठाम आहे.

आक्रमक भूमिकेमुळे दोन्ही पक्षातील नेते नाराज

ठाकरे गट सध्या महायुतीत सहभागी असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत त्यांची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील दोन्ही पक्षातील नेते नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जागावाटपाचा तिढा आता काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीने सोडवला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss