| TOR News Network |
Shivotsav News Nagpur : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० व्ये वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ऋणानुबंध फाउंडेशन व झिरो माइल युथ फाऊंडेशनच्या वतीने शिवोत्सव महाप्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे. (Runanubandh Foundation-zero mile youth Foundation) छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजकांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. महाराज उदयनराजे भोसले यांनी स्पर्धेला त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला.(Udayan raje bhosle in nagpur)
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ऋणानुबंध फाउंडेशनच्या व झिरो माइल युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निबंध – लेख,कविता-गीत, लघुचित्रफीत, गायन, वक्तृत्व, चित्रकला, छायाचित्रण, शिल्पकला व भिंतीचित्र इत्यादी स्पर्धांचा समावेश असून, या स्पर्धेत विजेत्यांना 15 लाख रुपये पर्यंतचे बक्षीसे, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. (15 laKH Prize money in Shivotsav)ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, संस्थेच्या Rfbharat या वेबसाईटवर नोंदणी करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या कामाची शैली, त्यांचे व्यक्तिमत्व हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आयोजकांचा आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नागपूरात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली यावेळी त्यांनी स्पर्धेला त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उदयराजे भोसले यांनी अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान केले. आणि या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आत्मसात करून आपल्या जीवनात उत्तुंग भरारी घेण्याकरिता ही स्पर्धा अत्यंत मौलिक आहे, असा संदेश उपस्थितांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी दिलेला आशीर्वाद व शुभेच्छा नक्कीच प्रेरणादायी आहे असे मत आयोजकांनी व्यक्त केले.(Shivaji Maharaj Jayanti Shivotsav Nagpur) याप्रसंगी ऋणानुबंध फाउंडेशन- झिरो माइल युथ फाऊंडेशनचे प्रशांत कुकडे, (Prashant Kukade) डॉ. समय बनसोड, (Dr. Samay Bansod) कल्याण देशपांडे व शिवोत्सव महाप्रतियोगीतेचे संयोजक डॉ.प्रा. किशोर इंगळे, (Co-ordinator Dr. Kishor Ingle) अजय चव्हाण, रविन्द्र शंखपाल,स्नेहा काळे, प्रीती कुलभजे, तुषार कठाळे, गौरव कुकडे, शिवेश हारगुडे, कु. वैशाली शास्त्रकार व अन्य आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.