Wednesday, January 15, 2025

Latest Posts

अर्ज भरायला ४ दिवस बाकी असताना महायुतीचे २ उमेदवार अद्यापही वेटींगवर

| TOR News Network | Mahayuti Seat Allocation : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचे उमेदवारी अर्ज भरायला अखेरचे ४ दिवस बाकी असताना महायुतीत अजून २ ठिकाणाच्या जागा वाटपासंदर्भात तिढा कायम आहे. (Mahayuti 2 seats discussion pending) सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची अद्याप प्रतीक्षा असून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Satara,Ratnagiri Sindhudurg seats on waiting)

सातारा लोकसभा (Satara loksabha) मतदार संघात महायुतीकडून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.(Udayanraje Bhosale from satara) त्याचबरोबर पुरुषोत्तम जाधव, नरेंद्र पाटील यांचीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र उमेदवारीच्या ११ याद्या प्रसिद्ध जाहीर झाल्या तरी अद्याप उमेदवाराचया नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. (Mahayuti 11 list released)

सोबतच सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटही आग्रही आहे. अजित पवार गटाकडून साताऱ्यात नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. (Ncp nitin patil from satara) त्यामुळे साताऱ्याची जागा नेमकी कोणाला जाणार? महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

साताऱ्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचाही उमेदवार अद्याप ठरलेला नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.(Narayan rane from Ratnagiri Sindhudurg) मात्र याठिकाणी शिवसेना शिंदे गटानेही दावा केला असून मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे याठिकाणीही कोणाला तिकीट मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss