Friday, January 17, 2025

Latest Posts

ट्विटरची लिंक डाउन झाली ? प्लीज चेक  

करोडो युझर्सला होत आहे मनस्ताप

Twitter (X) Down Latest News Today: समाज माध्यमावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ट्विटरची लिंक गेल्या अर्ध्या ते एक तासापासून डाउन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ट्विटरच्या करोडो युझर्सला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.(Twitter Link Down For More Then one Hour) लिंक संदर्भात कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या आहेत या बद्दल मात्र ट्विटरकडून अजून अधिकृत स्पष्ट करण्यात आले नाही.

देशातच नाही तर जगभऱ्यात ट्विटरचे करोडो वापरकर्ते आहेत. ते दररोज आपल्या भावना त्यावर व्यक्त करित असतात. मात्र गुरुवारी (21 डिसेंबर) अशाच करोडो युझर्सला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांना आपल्या मोबाईलवर अथवा संगणकावर ट्विटरची लिंक डाउन दिसून आली आहे. जवळपास अर्धा ते एक तास ट्विटरची लिंक डाउन होती. त्यामुळे अनेकांना याचा मलस्ताप सहन करावा लागला.यात 56 टक्के वापरकर्त्यांना वेबसाईट डाउन दिसून आली.तर 32 टक्के लोकांना तांत्रिक अडचणी आल्यात तर 12 टक्के लोकांचे लाॅग इन करता वेळी अडचणी आल्या आहेत.त्यामुळे अनेकांना आपल्या फाॅलोअर्सचे ट्विट पाहता आले नाही अथवा त्यावर व्यक्त देखील होता आले नाही.

Latest Posts

Don't Miss