Saturday, January 18, 2025

Latest Posts

संकटमोचन गिरीश महाजन यांचा खास नेता तुतारी फुंकत त्यांनाच देणार टक्कर

| TOR News Network |

Girish Mahajan Latest News :  राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे अडचणात आल्याचे बघायला मिळत आहेत. (Girish Mahajan in Trouble) त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे निष्ठावान  नेत्याने भाजपच्या सदसत्वाचा राजीनामा दिला आहे (Bjp Leader from jammer to left Bjp). त्यामुळ भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनच संकटात आले आहेत. विशेष म्हणजे हा नेता शरदचंद्र पवार गटात प्रवेश घेणार असून ते गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.(Girish Mahajan Man to Join Sharad Pawar Ncp )

भाजपचे निष्ठावान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी आपल्या भाजपच्या सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. (Dilip Khodpe resign Bjp )21 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते जाहीर प्रवेश करणार आहेत.(Khodpe to join Sharad Pawar Ncp on 21 Sept) जामनेर विधानसभा लढवण्याचीही त्यांची तयारी असल्याचे सांगण्यात आले.(Dilip Khodpe to fight against Girish Mahajan) यामुळे विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.पक्षाच्या नेत्यांनी मध्यंतरी त्यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्यावर शिक्कामोर्तब केले.

गिरीश महाजन गेल्या 30 वर्षापासून जामनेर विधानसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. (Sharad Pawar Ncp to contest jammer vidhan sabha) त्यामुळे खोडपे यांच्या माध्यमातून महाजन यांना मतदारसंघात मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss