Saturday, January 18, 2025

Latest Posts

पंकजा मुंडे यांना धक्का : बीड मध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढली

| TOR News Network | Beed Lok Sabha Latest News : ज्या नेत्याची बीड मध्ये मोठी ताकद आहे त्या नेत्याने महाविकास आघाडीचा उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवार पंकाजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. (Big Shock to pankaja munde in beed) बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार असल्याने बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगणार आहे. (Obc Vs Maratha Straight fight in beed)

यंदा लोकसभेच्या निवडणूकीत काही जागांवर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच बीडच्या जागेचा समावेश आहे. (All attention to beed lok sabha seat) माजी मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.(Former minister Suresh Navale to support Bajrang Sonawane) त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. (Shock to munde by navale) अगदी काहीच दिवसांपूर्वी नवले यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला होता.(suresh navle left shinde sena)

एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता. (Suresh Navale Early Left Shivsena)आता त्यांनी बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. (Navale has Big strength in Beed)त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली (The power of mahavikas agadi increased)असून महायुतीला मोठा झटका बसला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde From beed Lok sabha) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार असल्याने बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. (Bajrang Sonawane vs Pankaja munde)अशातच सुरेश नवले यांनी सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Pankaja munde may be in trouble) दरम्यान, आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलं आहे.

एक कार्यकर्ता मेळावा घेत नवले यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. “सध्या सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होत आहे, मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकजण नाराज असून शिवसेनेतून बाहेर पडत आहेत”, असं नवले यांनी म्हटलंय.(Many displeased worker left shinde shivsena)

Latest Posts

Don't Miss