Saturday, January 18, 2025

Latest Posts

Rahul Gandhi नंतर Moitra ची खासदारकी होणार रद्द ?

काय आहे दोन्ही खासदारांचे ते प्रकरण

आपल्या लोकसभेच्या पहिल्याच भाषणात सर्वांनी प्रभावीत करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर आता कोणती कारवाई करण्यात येणार याचा निर्णय गुरुवारी लोकसभेची शिस्त पालन समिती करणार आहे. (Trinamool Congress Mp Mahua Moitra Cash For Query Allegations Case ) मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याचा आरोप आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या एक अभ्यासू खासदार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली कमांड आहे. मात्र त्या सध्या अडचणीत सापडल्या आहेत.त्यांच्यावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गंभीर आरोप केले होतॆ. दुबे यांनी मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात आसा आरोप दुबे यांनी केला आहे.यावर मोईत्रा आणि दुबे यांच्यात आरोप प्रत्यारोप  देखील झालेत. मोईत्रा यांनी त्यांच्वर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.भाजप माझ्यावर गुन्हेगारी खटल्याची तयार करत असल्याचे त्यांनी एक्सवर म्हणंटले आहे.आता खासदार मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता असून त्यांना अपात्र ठरविण्याची शिफारसदेखील शिस्तपालन समितीकडून होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या  शिस्तपालन   समितीच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या सुणावणीच्या वेळी मोईत्रा हजर झाल्या होत्या.मात्र समितीने चौकटी बाहेरी प्रश्न विचारल्याचा आरोप करत त्या चौकशीतून बाहेर पडल्या होत्या.मात्र आता मोईत्रा यांना आपात्र ठरवत त्यांची खासदारकी रद्द होते काय हे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत ठरण्याची होण्याची शक्यता आहे.यापूर्वी  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती.त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्न विचारत  त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

Latest Posts

Don't Miss