Saturday, January 18, 2025

Latest Posts

यंदाही परंपरा कायम : या मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून कुणी तिसरा आणि तगडा उमेदवार नाही

| TOR News Network |

Maharashtra Vidhansabha Elections 2024 :  यंदाही कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा जालना विधानसभेसाठी आमनेसामने येणार आहे. अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल असा थेट सामना पुन्हा रंगणार आहे.( arjun khotkar vs kailash gorantyal) महायुतीकडून खोतकर  मैदानत आहेत  तर मविआकडून गोरंट्याला लढणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या 1999 पासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेवर पोहोचलं नाहीये. (jalna vidhansabha latest news)

1999 पासून जालना मतदारसंघात दर पाच वर्षांनी नवा आमदार विजय झाला…1999 साली शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंटयाल यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली.या लढतीत अर्जुन खोतकरांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी पराभव केलाय. तर 2004 मध्ये अर्जुन खोतकर यांनी गोरंटयाल यांचा पराभव केलाय..  2009 च्या विधानसभा निवडणूकीत गोरंट्याल यांनी शिवसेनेचे भास्कर अंबेकर यांचा पराभव केलाय.. तर 2014  साली पुन्हा अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल यांचा थेट सामना झालाय.

या निवडणुकीत अर्जून खोतकरांचा अवघ्या  296 मतांनी विजय झालाय..2019 च्या विधानसभा  निवडणुकीत कैलास गोरंटयाला पुन्हा विजय झालेत.. त्यांनी अर्जुन खोतकरांचा पराभव केलाय. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा पाचव्यांदा गोरंट्याल विरुद्ध खोतकर सामना रंगणार आहे.. त्यामुळे आपणच विजय होणार असल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय.. 

जालना मतदारसंघात गेल्या 25 वर्षांत अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांच्या व्यतिरिक्त कुणीही तिसरा आणि तगडा उमेदवार मैदानात उतरलेला नाही. मात्र यंदा रावसाहेब दानवे यांचा भाऊ भास्कर दानवे पक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (bhaskar danve to contest jalna vidhansabha)  गेल्या विधानसभेत अर्जुन खोतकर शिवसेनेकडून लढले होते.. आता ते शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत. त्यामुळे यंदा प्रत्येक पाच वर्षांनी नव्या आमदाराची परंपरा कायम  राहणार की त्याला ब्रेक लागणार हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.  

Latest Posts

Don't Miss