Saturday, January 11, 2025

Latest Posts

नववर्षांच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळ हाऊसफुल

धमाल मस्तीसाठी गोवा,महाबळेश्वर पाचगणीला पसंती

Top Hot Spots To Celebrate New Year 2024 : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वर पाचगणी तसेच गोवा तपर्यटकांनी बहरलं आहे. (Tourist ready to welcome new year celebration 2024) या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर गोवा, महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. (Tourist ready to welcome new year 2024)

नववर्षांच्या स्वागतासाठी बाजारपेठा विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. या बरोबर खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. विविध पॉईंट्स बाजूने टेबल लँड वर ही गर्दी आहे. ऐन थंडीतही पर्यटक आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. (In Goa, Mahabaleshwar Panchgani Tourist Ready To Welcome New Year 2024)

गोव्याचे बिचवर पर्यटकांची गर्दी वाढली असून अनेक जण तेथील वाॅटर स्पोर्टची मजा लुटत आहे. विदेशी पाहूण्यांची देखील गर्दी तेथे पहायला मिळत आहे. तर राज्यात महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक तापोळा पाचगणी पर्याय म्हणून पहात आहेत. येथील बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून येथील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम ,जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसत आहे. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक धम्माल मस्ती करत आहेत.महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हॉटेल्स, लॉजसाठी पर्यटक विविध साइट्‌सच्या माध्यमातून ‘ऑनलाइन बुकिंग’ चा वापर करताना दिसत आहेत.

नववर्षानिमित्त हॉटेल्स मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे यावे त्यासाठी इमारतीला रंगरंगोटी विद्युत रोषणाई व जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल करण्यात आली आहे. विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाबळेश्वर पाचगणी परिसर गर्दीने फुलून गेला आहे. गिरिस्थानांवर वाढलेली गजबज या शहरांच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत

Latest Posts

Don't Miss