Monday, November 18, 2024

Latest Posts

लोकसभेसाठी हे दोन कट्टर विरोधक आमने सामने

| TOR News Network | Narayan Rane Loksabha News : राज्यसभेत डच्चू मिळाल्यानंतर आता नारायण राणे आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यंदा त्यांना लोकसभेत कडवी झुंज द्यावी लागू शकते. कारण नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात यांदा दोन कट्टर विरोधक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. (Tough Fight In Kokan For loksabha)

राज्यसभा निवडणुकीत भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संधी हुकली आहे. मात्र, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणे यांची उमेदवारी पक्की मानली जातेय. (Narayan Rane loksabha from Ratnagiri Sindhudurgh)

गेल्या काही आठवड्यांपासून राणे लोकसभा लढविण्याचे संकेत देण्यात येत होते. राज्यसभेच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होण्याची शक्यता आहे.(Narayan Rane Vinayak Raut Straight Fight)

बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार 

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राणे प्रयत्नशील होते

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील विधान जाहीरपणे केले होते. तरीसुद्धा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राणे प्रयत्नशील होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपने नक्की केली, त्यामुळे आपोआपच राणे यांचा पत्ता कट झाला आहे.

किरण सामंतांच्या उमेदवारीची शक्यता धूसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. वातावरण निर्मितीबरोबरच राजकीय पातळीवरही त्यासाठी ते विविध आघाड्यांवर प्रयत्नशील होते. परंतु, राणे यांची राज्यसभेची संधी गेल्यामुळे मतदारसंघाची राजकीय गणिते बदलली असून किरण सामंत यांच्या उमेदवारीची शक्यता धूसर बनली आहे.

Latest Posts

Don't Miss