Friday, January 17, 2025

Latest Posts

पाच लाख मत घेणारे बजरंग सोनवणेने वाढवले पंकजा मुंडेचे हार्टबीट

| TOR News Network | Beed Lok Sabha News : शरद पवार यांनी बीडमध्ये पॉवरफुल्ल राजकीय गेम खेळला आहे. अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे.(Sharad Pawar Candidate for beed) बजरंग सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते सर्वाधित मते मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी पंकजा मुंडे यांना टफ फाईट दिली होती. (Bajrang Sonawane VS pankaja munde) त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.

बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी अनेक दिवस होते. या अगोदर बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवली होती. त्यामध्ये त्यांना 5 लाख मते पडली होती. (Sonawane got 5 lakh votes in 2019) तर प्रीतम मुंडे यांना सहा लाख मते पडली होती. मात्र, प्रीतम मुंडे यांना राज्यासह देशात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. राज्यामध्ये गेल्या काही दिवसात राजकारण ढवळून निघाल्यानंतर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यामुळं भाजपाची अनेक मंडळी नाराज आहेत.(Pankaja munde from beed lok sabha)

आता बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्यातून काही अपक्ष उमेदवार उभे राहतील का? हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. कारण ज्योती मेटे या दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत.  विनायक मेटे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभं केलं होतं. मराठा आरक्षणाच्या बैठकीस जात असतानाच त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यामुळं मराठा समाज ज्योती मेटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभा करतील का?, की बजरंग सोनवणे यांना मदत करतील हे पाहावं लागणार आहे.(Jyoti mete from beed)

बीडमध्ये तिरंगी लढत होणार ?

शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे आता ज्योती मेटे या बीडमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Jyoti mete Independent candidate) ज्योती मेटे यांनी याआधी प्रतिक्रिया देताना आपलं पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असंही त्या म्हणाल्या होत्या. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी ज्योती मेटे यांना आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे आता ज्योती मेटे या अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्योती मेटे या अपक्ष लढल्या तर बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ज्योती मेटे या शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत.

Latest Posts

Don't Miss