Monday, January 13, 2025

Latest Posts

उद्या मतदान ; राणा – वानखेडे, काळे – तडस, देशमुख – पाटील, धानोरकर – मुनगंटीवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

| TOR News Network | Lok Sabha Poll Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्य दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता उद्या 26 एप्रिल रोजी देशातील 89 मतदार संघासोबतच विदर्भातील 8 मतदार संघात मतदार राजा त्यांचा नेता निवडीसाठी मतदान करणार आहे. (8 seats voting in vidarbha) विदर्भात राणा – वानखेडे, काळे – तडस, देशमुख – पाटील, धानोरकर – मुनगंटीवारांसह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.(Tomorrow second phase voting for lok sabha)

काल देशभरात जोरदार प्रचार आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांवर तुफान दारुगोळा डागला. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत.(Second Phase Of Campaigning Is Over) उद्या शांततेत मतदान होण्यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशातील 89 मतदार संघात मतदान होईल. यामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा वायनाड मतदार संघ पण आहे. राहुल गांधी येथून निवडणूक लढवत आहे.(Rahul gandhi from Wayanad) तर राज्यात हायहोल्टेज ठरलेल्या अमरावतीमध्ये उद्या मतदान होत आहे. (Tomorrow high voltage amravati voting)

या जागांवर होणार मतदान

देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 89 जागांवर उद्या मतदान होईल. (In india tomorrow voting at 89 place) दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील सर्वच 20 लोकसभा जागांवर मतदान होईल. कर्नाटकमधील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगालमधील 3 तर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

राज्यात या लोकसभा मतदारसंघात मतदान

शुक्रवारी 26 एप्रिल रोजी राज्यातील 8 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम हे पश्चिम विदर्भातील (voting in West Vidarbha) मतदारसंघ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 204 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर दीड कोटी मतदार त्यांचा खासदार निवडतील.

7 टप्प्यांमध्ये देशभरात मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातील 19 एप्रिल रोजी काही मतदारसंघात मतदान झाले. राज्यातील पूर्वी विदर्भातील मतदारसंघाचा त्यात सहभाग होता. आता राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होईल. पुढील टप्प्यात 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.

हे उमेदवार  आहेत चर्चेत

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी हे उमेदवार आहेत.(Rahul Gandhi from waynad) तिरुअनंतपूरम येथून काँग्रेसचे शशी थरुर उभे आहेत. उत्तर प्रदेशातील मथुरेतून हेमा मालिनी या भाजप उमेदवार आहेत.(hema malini from mathura) छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, सभापती रमण सिंग हे नशीब आजमावत आहेत. कर्नाटकमधील मांड्यामधून जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, मेरठमधून अरुण गोविल हे भाजपचे उमेदवार आहेत. तर राज्यात अमरातीतून नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार आहेत.(navneet rana from amvrati)

Latest Posts

Don't Miss