Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुंबईच्या अस्तित्वाची लढाई : आज प्रेक्षक विरुद्ध हार्दिक सामना

| TOR News Network | Hardik Pandya Latest News : यंदा आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा खेळ निराशाजनक राहिला.सलग दोन पराभवाचा सामना त्यांना करावा लागला.आज मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार असला तरी हा सामना पंड्याविरुद्ध मुंबईकर प्रेक्षक असा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (Mumbai crowd vs Pandya)

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ आज  वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.(Mumbai vs Rajasthan royals) स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. (Win is must for Mumbai) सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणारी परिस्थिती आहे.(For Hardik Pandya, it is an existential situation) खेळाडू म्हणून कामगिरी उंचावणे, कर्णधार म्हणून संघाला पहिला विजय मिळवून देणे यापेक्षा स्टेडियममधून होणाऱ्या विरोधाचा सामना करणे हे हार्दिकसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकेल.(Pandya vs mumbai crowd)

दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना

रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला मिळालेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेले नाही. (Crowd wants rohit sharma as a captain for mumbai) गुजरात संघातून दूर झाल्यामुळे गुजरात संघाचे पाठीराखे दुखावले आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकला दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही तेथील प्रेक्षक रोहित…रोहित…असा नारा देत होते.(Fans Anger on Hardik Pandya)

यावर कोणी विश्वास ठेऊ नये

मुंबईत आड होणाऱ्या सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. याची कल्पना मुंबई इंडियन्स संघालाही आहे. हार्दिकला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या किंवा शेरेबाजी केली तर त्यांना पकडण्यात येईल आणि त्यासाठी स्टेडियममध्ये अतिरित्त पोलिस तैनात करण्यात येतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु ही अफवा आहे.(But this is a rumour says MCA) यावर कोणी विश्वास ठेऊ नये, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामना एका बाजूला आणि हार्दिकला होत असलेला विरोध दुसऱ्या बाजूला असे चित्र वानखेडेवर असण्याची शक्यता आहे.(Opposition to Hardik)

बुमराद्वारे आक्रमण गोलंदाजीची शक्यता

इतर संघांविरुद्ध अडखळणाऱ्या, परंतु मुंबईविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबाद संघाने कागदावर बलवान असलेल्या मुंबई गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. यात ज्याची क्रिकेट विश्वात धास्ती घेतली जाते त्या जसप्रित बुमराचे अस्त्र आपल्या भात्यात असताना त्याचा वापरच योग्य वेळी न करण्याच्या कर्णधार म्हणून हार्दिकच्या डावपेचांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १३ षटकांत बुमराला केवळ एकच षटक देण्यात आले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत बुमराद्वारे आक्रमण गोलंदाजीची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss