Saturday, January 11, 2025

Latest Posts

आज राहुल गांधी यांचा थेट शेतात मुक्काम  

| TOR News Network | Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मोठ्या दिमाखात पुढे जात आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.मात्र प्रशासनाकडून यात्रेला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही असा अरोप काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. सध्या यात्रा उत्तर प्रदेशातील भदोहीत पोहोचलीय. कुठे प्रशासकीय यंत्रणा त्यांना सभेसाठी विरोध तर कुठे यात्रेच्या मार्गात बदल करण्यास लावला जात आहे. या सर्व अडचणींना पार करत काँग्रेस नेते राहुल गांधींची यात्रा मार्गक्रमण करत आहे. आज राहुल गांधींची यात्रा भदोही येथे पोहोचली. येथेही त्यांना नियोजित ठिकाणी विश्राम करण्याची परवनगी नाकारण्यात आलीय. (Administrative system not Supporting Bharat jodo nyay Yatra)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या ताफ्याला पूर्वनिश्चित विश्राम स्थळी राहण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही. यामुळे ते मुन्शी लातपूर येथील एका शेतातच मुक्काम ठोकणार आहेत. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १७ रोजी रात्री जिल्ह्यातील ज्ञानपूर भागात असलेल्या विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे यांनी गुरुवारी दिली. फेब्रुवारीला मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकराली.

आता भारत जोडो नाही तर भारत न्याय यात्रा काढणार राहुल गांधी

राहुल गांधींना परवानगी का मिळाली नाही

विभूती नारायण इंटर कॉलेज हे पोलीस भरती परीक्षेचे केंद्र करण्यात आले आहे. तेथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोन्ही शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. त्यामुळे यात्रेला आवारात मुक्काम करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचं असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक राजेश भारती म्हणालेत. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जिल्हा प्रशासनावर आडकाठी आणल्याचा आरोप केलाय.यात्रेच्या मुक्कामाची माहिती पक्षाने आठवडाभर अगोदर प्रशासनाला दिली होती. इतर अनेक महाविद्यालये पर्याय म्हणून उपलब्ध आहे तरीही याच महाविद्यालयालाच परीक्षा केंद्र करण्यात आल्याचा आरोप स्थानिक काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

राहुल आणि त्यांच्या यात्रेतील सर्व कार्यकर्ते आता मुन्शी लतपूर येथील उदयचंद राय यांच्या शेतात रात्रीचा मुक्काम करणार आहेत. (Rahul gandhi stay in farm) त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. मैदानात मुक्कामाची तयारी सुरू करण्यात आलीय. राहुलच्या नेतृत्वाखाली पक्षाची न्याय यात्रा चौरीच्या कंधिया रेल्वे क्रॉसिंगवरून भदोही जिल्ह्यात प्रवेश करेल. त्यानंतर राहुल इंदिरा मिल चौकातील गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर ते राजपुरा चौरस्त्यावर जातील तेथे ते भदोही आणि मिर्झापूर जिल्ह्यातील जनतेला एका जाहीर सभेत संबोधित करतील, अशी माहिती राजेंद्रकुमार दुबे यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss