Sunday, January 12, 2025

Latest Posts

जागावाटपाचा तिढा सुटणार : आज महायुतीची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद  

| TOR News Network | Mahayuti Press Conference Today : लोकसभा निवडणुकीच्या  प्रचाराला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे.उद्या विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व ४८ जागांचे वाटप झाले असून ते कामाला लागले आहे.तर दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र अजून काही जागांचा तिढा कायम आहे. आज मुंबईत महायुतीची एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे.(Mahayuti press conference) यात ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी तिढा सुटल्याची चर्चा आहे. यातील ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडल्या गेल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.(Mahayuti Seats Allocation Solution)

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलीये. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी म्हणजेच उद्या होणार आहे. (Tomorrow Voting of first phase in vidarbha)अशात अद्यापही महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र आज हा तिढा सुटणार असल्याचं म्हटलं जातंय. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट या तिन्ही पक्षांची आज पहिली संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे.

ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी महायुतीमधील तिढा सुटल्याची चर्चा आहे. यातील ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडल्या गेल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. (pratap sarnaik from thane in lok sabha) तर नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे आणि संदीपान भुमरे यांना औरंगाबादमधून उमेदवारी मिळू शकते. आज होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(mahayuti Official announcement of set allocation)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळू शकतो. येथे निवडणूक लढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक आहेत. (narayan rane or kiran samant) तसेच किरण सामंत हे देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत या जागेचाही उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळालीये.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नसणार

दक्षिण मुंबईतील चर्नीरोड येथील ठक्कर येथे महायुतीची पहिली पत्रकार परिषद आज होणार आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार प्रसाद लाड, अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील आणि शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेपासून लांब असणार आहेत.(Cm Dcm will not conduct press conference)

Latest Posts

Don't Miss