Sunday, January 12, 2025

Latest Posts

आज चौथ्या टप्प्यात मतदान : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Theonlinereporter.com – May 13, 2024 

Lok Sabha Elections 4th Phase Voting Update : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात आज (13 मे) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे.(Fourth Phase Lok Sabha Voting) यात महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. आजच्या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Voting in 11 constituencies Maharashtra)

लोकसभा निवडणुकीच्या  चौथ्या टप्प्यासाठी आज  मतदानाची रणधुमाळी पार पडत आहे. एकूण पाच टप्प्यातील निवडणुकांपैकी राज्यातील तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. (Voting of fourth phase loksabha) यामध्ये जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, संभाजीनगर, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. (11 Constituency voting) या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष याकडं लागलंय.

राज्यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज नेते यंदा मैदानात आहेत. तसंच पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत. त्यामुळं या लढतीत कोण बाजी मारेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss