Saturday, January 18, 2025

Latest Posts

वाघनखे ही मते मागण्याची वस्तू आहे का ?

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : संजय राऊत यांनी वाघ नखांबद्दल आपले मत मांडले आहे.त्यांनी या वाघनखां बद्दल संशय व्यक्त केला असून या वाघनखांचे राजकारण केल्या जात असल्याचे म्हणटंले आहे. ते म्हणालेत आम्ही वाघनखांचा अपमान करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाघनखांचा अपमान करत आहे. (Sanjay Raut On Tiger Claws ) महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे, वाघनखे ही मते मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का, असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे –फडणवीस सरकारला केला आहे.(Tiger Claws Stunt For Vote)

गेली शेकडो वर्षे लंडनच्या म्युझियममध्ये असणारी वाघनखे गुरूवारी (18 जुलै) महाराष्ट्रात आणण्यात आली. (Tiger Claw in Maharashtra) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही वाघनखे महाराष्ट्रात कशी आली, असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी महायुतीवर आगपाखड केली आहे. तसेच, वाघनखांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती राजकारण करू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.(Sanjay Raut Slams on Mahayuti)

आज सकाळी माध्यामांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांबद्दल नितांत आदर आणि श्रद्ध आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Tiger Claws) पण तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं वाघनख करत आहात. पण ही वाघनखे तीच आहेत का, हे कोणीही खात्रीने सांगू शकणार नाहीत.(Sanjay Raut Ask Proff For Tiger Claws) वाघनखांवर बेईमान लाकांनी बोलू नये, ते स्वत: ड्युपलिकेट आहेत त्यामुळे त्यांनाही ड्युपलिकेट मालाचे आकर्षण आहे. लोकांना फसवण्याचे काम सुरू आहे ती तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

ती वाघनखे जर खरेच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर ती आनंदाची बाब आहे.  पण ती वाघनखे शिवरायांची नाही, असे काही पुरांव्यांच्या आधारे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील काही इतिहास तज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार,ती शिवरांची वाघनखे नाहीत. इतकेच नव्हे तर लंडनच्या ज्या वस्तू संग्रहालयात ती वाघनखे होती. तेथील प्रशासनालाही ती वाघनखे शिवरायांची असल्याची खात्री नाही.  त्यामुळे आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी भाजपचा हा जुमला असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.(Tiger Claws A political Stunt by Bjp Says Mp Raut)

Latest Posts

Don't Miss