Friday, January 17, 2025

Latest Posts

काँग्रेसला मोठा धक्का : विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय व तीन वेळा आमदार राहिलेला हा नेता अमित शाहांच्या भेटीला

| TOR News Network | Dilip Sananda Latest News : काँग्रेस पक्षाला एका पाठोपाठ एक एक धक्के बसत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते व अल्पसंख्यक चेहरा असलेले बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेस सोडली.आता परत एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. (Khamgaon Dilip Sananda to join bjp) काँग्रेसचे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Khamgaon Former Mla to join Bjp)

विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय

दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Dilip Sananda Meet Amit Shah) त्यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते.(Sananda Very close to Vilasrao Deshmukh) मात्र विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे.

२०१४ साली मोदी लाटेत सानंदा यांचा पराभव

दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून ते सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. मात्र २०१४ साली मोदी लाटेत भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. (Sananda declared not to contest election )राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली होती. त्यावेळी दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सक्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss