Saturday, January 11, 2025

Latest Posts

बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी आलेल्या 3 जवानांचा मृत्यू

| TOR News Network |

Boat Sank In Pravara River : अहमदनगर जिल्ह्यातील  प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. (Two boys drown in Pravara river) या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. (Pravara river Boat sank Tragedy) या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. (Boat sank 3 SDRF jawan drowned) तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. (Search for the two jawans)

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरु केला होता. परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होतो. यामुळे जवानांची बोट उडाली. (search operation boat sank) यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. (3 jawan died while search operation) त्याचे मृतदेह मिळाले आहेत. तसेच दोघांचा शोध सुरु आहे. (3 SDRF jawans body find out) या बोटीत एसडीआरएफचे ४ जवान आणि १ स्थानिक नागरिक होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळच ही घटना घडली आहे. जे जवान वाचवण्यासाठी आले, त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळाल्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहचले. (balasaheb thorat visited spot) त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दोन जणांच्या शोधासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली.

सोलापूरमधील पाच जणांचा मृतदेह मिळाले

सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.(solapur boat sank 5 died) या पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहे.(Solapur boat sank 5 body find out) त्यात कृष्णा दत्तू जाधव (वय 28), कोमल कृष्णा जाधव (वय 25), वैभवी कृष्णा जाधव (वय 2.5), समर्थ कृष्णा जाधव (वय 1) आणि अनिकेत ज्ञानदेव अवघडे (वय 21 ) यांचा समावेश आहे. बुडालेल्यांमधील गौरव डोंगरे यांचा मृतदेह सर्वात शेवटी मिळाला. सर्व मृतदेह मिळाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. करमाळा तालुक्यातील कुगाव उजनी जलाशयाच्या काठावर गौरव डोंगरे यांचा मृतदेह मिळाला.

Latest Posts

Don't Miss