Saturday, January 18, 2025

Latest Posts

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

आरोपीच्या शोधासाठी लखनऊ पोलीसांचे चार पथके तैनात

| TOR News Network | Bomb Threat To Yogi Adityanath: दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींना त्यांचे वडील राजीव गांधींप्रमाणे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांच्यावर बॉम्बहल्ला होईल, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती.ही घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या एका कॉलने खळबळ उडवून दिली.या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.(Bomb Explosion threat to kill Cm yogi Adityanath) पोलिस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर हा कॉल आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Threat Call for Bomb Explosion to kill yogi)

लगेचच कॉल डिस्कनेक्ट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवाली येथील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सीयूजी नंबरवर धमकीचा कॉल आला होता, जो हेड कॉन्स्टेबलने घेतला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल, (Call to police for Up Cm Yogi Will Kill)असे कॉलरने कॉन्स्टेबलला सांगितले. कॉन्स्टेबलने विचारले असता तुम्ही कुठून बोलत आहात? तेव्हा कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला.

पोलीसांकडून तपास सुरू

कॉन्स्टेबलने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या फोनची माहिती दिली, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सध्या सुरक्षा मुख्यालयात तैनात असलेल्या मुख्य हवालदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.(Up Police In search)

रात्री १०.०८ वाजता मोबाईलवर कॉल

आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.(Up Police In Action) सीएम योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत.चीफ कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १०.०८ वाजता त्यांच्या मोबाईलवर कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सीएम योगींना बॉम्बने उडवले जाईल असे सांगितले. उधम सिंह यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतर उधम सिंह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Latest Posts

Don't Miss