| TOR News Network |
Sanjay Raut on Mlc Election : शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादीची सर्व 12 मते जयंत पाटील यांना पडली आहेत. काँग्रेसची सात मते गेल्या दोन वर्षापासून काँग्रेससोबत नाहीत. ते फक्त कागदावर काँग्रेससोबत आहेत. (Sanjay Raut on congress mla) ते आता नावानिशी समोर आलं आहेत. याच सात लोकांना घेऊन कालचा खेळ केला. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. शिंदे आणि अजित पवार गटाने फार मोठी झेप घेतली. फार मोठं युद्ध जिंकलं… अजिबात नाही. सरकार आहे, सत्ता आहे. लहान पक्ष आणि अपक्ष सत्तेसोबत असतात, असे मत शिवसेना (उबाठा गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केले. (Sanjay Raut slams Shinde)
शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करत आहेत ? ते दोन गद्दार गट आहेत. त्यांनी आपल्या गटातील २-२ गद्दांराना आपल्या ताकदीवर निवडून आणलं. अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे व अजित पवार गटावर निशाणा साधाला. (Sanjay Raut on Fadnavis) विधान परिषद निवडणुकीच्य निकालानंतर ते बोलत होते. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
ते विजयाचा उत्सव साजरा करत आहेत, जणू काही महाराष्ट्र जिंकला आहे. ज्याला राजकीय ज्ञान, अक्कल आहे, त्याने कालच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर दिसेल की भाजपचे 103 आमदार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले. त्यांची तेवढी ताकद होती.
विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर काल जाहीर झाला.या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवारही विजयी झाले. मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे अशी चर्चा आहे.
महाविकास आघाडीला काय फटका बसला. काँग्रेसने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसतानाही आम्ही काँग्रेसच्या मदतीने उमेदवार निवडून आणला. काँग्रेसची 7 मते फुटली. (7 votes of congress breaks) ते लपून राहिले नाही. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही मान्य केलं. (Sanjay Raut on nana patole) सात मते फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हे तेच सात लोकं आहेत. चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. तेव्हा या सात लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं. त्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय, महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले.