Saturday, November 16, 2024

Latest Posts

धिरज देशमुख यांच्या विरुध्द मनसेचा हा उमेदवार मैदानात

| TOR News Network |

Dhiraj Deshmukh Latest News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच मराठवाड्याचा आढावा घेतला.(Raj Thackeray Latur News) लातूर मुक्कामी असताना त्यांनी लातूर ग्रामिण विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. मनसे किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे हे मनसेच लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. (MNS Shankar Nagargoje Vs Dhiraj Deshmukh) नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या मतदार संघात ते काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देखमुख यांना आव्हान देतील.विशेष म्हणजे धिरज देशमुख हे २०१९ च्या निवडणुकीत १ लाख २१ हजारांनी निवडून आले आहेत.त्यामुळे नागरगोजे यांना मोठी ताकद लावावी लागणार आहे.

संतोष नागरगोजे हे सध्या मनसेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर मनसेच्या किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली राजकीय वाटचाला भारतीय विद्यार्थी सेनेपासून केली. राज ठाकरेहे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळी संतोष नागरगोजे हे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष होते. पुढे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली. त्यावेळी नागरगोजे हे राज ठाकरे यांच्या बरोबरच राहीले. त्यांना लातूर जिल्हाध्यक्ष करण्यात आले.(Nagargoje MNS District President) पुढे त्यांना पक्षाचे सरचिटणिसही करण्यात आले. शिवाय त्यांच्यावर मनसे किसान सेनेची जबाबदारी देण्यात आली. मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्येही त्यांचा समावेश होता. त्यात त्यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

संतोष नागरगोजे यांना दोन विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे.(Nagargoje contested 2 times vidhansabha) त्यांनी 2009, 2014 ची विधानसभा निवडणूक लढली आहे. ही निवडणूक ते लातूर ग्रामिण याच मतदार संघातून लढले आहेत. पण त्यांना दोन्ही वेळा पराभव स्विकारावा लागला होता. काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे,आणि रमेश आप्पा कराड यांच्या विरोधामध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना 2006 मध्ये मिळाला होता.

लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा गड मानला जातो.(Latur Gramin is Strong Voting constituency) या मतदार संघाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला होता. यावेळी त्यांना मनसेचे संतोष नागरगोजे हे आव्हान देणार आहेत. आपण सर्व सामान्य कुटुंबातील आहोत. जनतेसाठी नेहमीच रस्त्यावर असतो. जनतेचा आवाज आपण उचलतो. आपले मतदार संघात काम आणि संपर्क आहे. या गोष्टींना जनतेने महत्व दिले तर आपला विजय नक्की आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जनतेने ठरवले तर घराणेशाहीला या निवडणुकीत ब्रेक लागेल असेही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss