Sunday, January 12, 2025

Latest Posts

टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू होऊ शकतो बाहेर

| TOR News Network | Team India Latest News : राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. (Team India On lead by 2-1)मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर रंगणार आहे.(Ind vs Eng 4th Test) दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.(Big Shock to Team India Ahead Of 4th Test)

 क्रिकबजच्या वृत्तानुसार, रांची कसोटीत भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. (Jasprit Bumrah on rest) भारतीय संघातील खेळाडू मंगळवारी (२० फेब्रुवारी) राजकोटवरून रांचीसाठी रवाना होणार आहेत. मात्र जसप्रीत बुमराह भारतीय संघासह रांचीला जाणार नाही. बुमराह राजकोटवरून अहमदाबादला रवाना होणार आहे.

 विश्रांती कशासाठी देणार

जसप्रीत बुमराहने सुरुवातीच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Jasprit Bumrah played 3 test) या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराहने मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये ८०.५ षटक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने सर्वाधिक १७ गडी बाद केले आहेत.

या खेळाडूला मिळू शकते संधी

रांची कसोटीनंतर मालिकेतील अंतिम कसोटी सामना धर्मशाळाच्या मैदानावर रंगणार आहे.(4th test at ranchi then 5th at dharamshala) अंतिम कसोटीत बुमराह खेळणार की नाही, हे चौथ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.थ्या कसोटीत मोहम्मद सिराज मुख्य गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. तर मुकेश कुमारला बुमराहच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

Latest Posts

Don't Miss