Saturday, January 11, 2025

Latest Posts

मला शंभर टक्के अटक होणार….

मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

| TOR News Network | Manoj Jarange Patil Latest News: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार असल्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. त्यावरून मला १०० टक्के अटक करण्यात येणार आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. (I will be arrested 100 percent)

जरांगे पाचील म्हणाले मुंबई येथे मोर्चा गेला तेव्हापासून ट्रॅप रचण्याचे काम सुरू आहे. (From Mumbai traps has been going on) न्यायालयाने संगीलं शांततेत आंदोलन करा, आम्ही शांततेत आंदोलन केलं मग गुन्हे का दाखल केले? मला १०० टक्के अटक करणार आहेत. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमची मुलं मोठी व्हावीत यासाठी मी लढत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 मी जातीवादी नाही

मला सध्या बरं वाटत नाहीये. मी चांगला झालो की पुन्हा दौरा सुरू करणार आहे. संपूर्ण राज्यभर दौरा कारणार आहे. सगळ्या जातीचे लोक आमच्या बाजूने आहेत. मी जातीला बोललो नाही, मी एकट्याला बोललो मी जातीवादी नाही, असंही जरांगेंनी यावेळी म्हटलंय.माझ्यावर गुन्हा दाखल केल्यावर आम्ही देखील गुन्हे दखल करू. न्यायालय आम्हाला न्याय देईल. सहा महिने आम्हाला फसवल. जे आमदार अधिकारी आले त्यांच्यावर आम्ही घुन्हे दाखल करणार आहोत. तुम्ही सुरुवात करा मग आम्ही दाखवू काय आहे, असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

तिथे मला काही झालं तरी मी….

माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी पुढे म्हटलं की, मी मागे हटणार नाही त्यांचं म्हणणं १० टक्के आरक्षण घ्यावं आहे. मात्र मी आरक्षण दिलं तरी थांबणार नाही. अटक केली तरी पोलीस ठाण्यात बसुन मी आंदोलन करणार आहे.तिथे मला काही झालं तरी मी मागे हटणार नाही. १० टक्के आरक्षण ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं मात्र आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे, अशा शब्दांत जरांगेंनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत आपली भूमिका मांडलीये.

Latest Posts

Don't Miss