Friday, January 17, 2025

Latest Posts

त्यांना उत्तर देण्यासाठी तुरुंगातील प्रवक्ता लागतो – खा. राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : भाजपा पराभवाच्या भिती सतावत आहे. विरोधकांवर हल्ला करण्यासाठी अशा संत, महात्म्यांचा वापर करणार असेल, तर त्यांनी निवडणूक न लढता पराभव मान्य केला आहे” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.(Sanjay Raut On Mahayuti Defeat) तुरुंगात असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. (Sachin vaze on Anil Deshmukh) “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले की, “अनिल देशमुखांनी माहिती समोर आणली. त्यांनी फडणवीसांवर आरोप केलेत. फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो”(Sanjay Raut On DCM Fadnavis)

“मागच्या वर्षभरापासून सांगतोय, राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही प्रमुख लोक तुरुंगातील गुंडाचा वापर करतायत. तुरुंगात फोन जातायत. आज ते घडतय” असं संजय राऊत म्हणाले. एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्त्व देता.(Sanjay Raut On Sachin Vaze) “महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टोळीने खाली आणून ठेवलाय. तुमच्याकडे प्रवक्ते नाहीत, म्हणून तुम्ही तुरुंगातील गुंडांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलीय. महाराष्ट्राची मान शरमेने खाली जातेय” असं संजय राऊत म्हणाले.

“भाजपाच्या लोकांची नार्को टेस्ट करा. मग समजेल 10 वर्षात त्यांनी काय कांड केलेत. अनिले देशमुख, मी, नवाब मलिक यांना ईडी, पोलिसांचा गैरवापर करुन आम्हाला अडकवलं” असं संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut On Anil Deshmukh,Nawab Malik) जयंत पाटील यांचं नाव वाझेने घेतलं, त्यावर राऊत म्हणाले की, “मी तुरुंगातले असे 10 लोक उभे करीन, जे फडणवीसांच नाव घेतील. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगितलं की, पाहिजे की, अशा गुंडाच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेऊ नका.(sanjay raut slam sachin waze allegation) हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे, पण ते टाळ्या वाजवत आहेत”

सचिन वाझे कधी काळी शिवसेनेच्या जवळ होते, यावर संजय राऊत म्हणाले की, “कधी काळी सचिन वाझेच नाही, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह सुद्धा आमच्या जवळचे होते. अब मुंडा बिगडा गया तो हम क्या करे”

Latest Posts

Don't Miss