Saturday, January 11, 2025

Latest Posts

कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार

Theonlinereporter.com – May 17, 2024 

Prakash Ambedkar Latest News : वंचितचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. आंबेडकर यांनी गोरेगाव येथील सभेत केलेल्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे.(Prakash ambedkar in goregaon rally) त्यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे. (Prakash ambedkar statement goes viral) शिवसेना (ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण आंबेडकर यांच्या मते मुंबई चित्र वेगळे आहे.(Ambedkar on mahavikas aghadi)

आंबेडकर म्हणालेत लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे असा हल्लाबोल आंबेडकरांनी किर्तीकरांवर केला आहे. (Ambedkar on Kirtikar) शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पण दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईचा गड काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात पुन्हा डेरेदाखल आहेत. रोड शोज, सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरशीचा सामना आहे. (Tough fight in Mumbai North-West) उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार शड्डू ठोकून आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी ठाकरे गटाची प्रचाराची धुरा पेलली आहे. या मतदारसंघाविषयी अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे. (Prakash ambedkar latest statement)

मुंबई उत्तर पश्चिममध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. (prakash ambedkar on BJP) मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गोरेगाव येथील सभेत केला. ते वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Latest Posts

Don't Miss